कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीने मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना निधीपासून वंचित असलेल्या कामगारांना कोरोना निधी मिळावा, या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी कृती समितीसमवेत मंत्री मुश्रीफ यांनी चर्चा केली.
संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी कामगारमंत्री हसन यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात बांधकाम कामगारांना कोरोनामध्ये जाहीर केलेला निधी तीन हजार, दोन हजार आणि पंधराशे रूपये असा जाहीर केला आहे. पण कोल्हापूर जिह्यातील सुमारे 35 हजार कामगार या लाभापासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळावा. मृत कामगारांच्या वारसांना पेन्शन योजना लागू करावी.
मंडळाकडून मिळणारे अंत्यविधी व मदत 2 लाखांचे लाभ लवकर मिळावेत, ग्रामीण बांधकाम कामगारांना कॉन्ट्रक्टर दाखले मिळत नाहीत त्यांना ग्रामसेवकांचे मार्फत दाखले मिळावेत, यांचा समावेश आहे. निवेदन देताना कृती समितीचे अध्यक्ष संजय धुमाळ, तानाजी तावडे, मच्छिंद्र कांबळे, दयानंद कांबळे, गुणवंत नागटीळे, एकनाथ गुरव, अभिजित केकरे, संजय सुतार आदी उपस्थित होते.









