प्रतिनिधी / सेनापती कापशी
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्जुनवाडा (ता. कागल) या गावात रक्षाबंधन सण साजरा केला. ५० हून अधिक बहिणीनी आपल्या या लाडक्या भावाला अतुट भावबंधनाचा धागा बांधला.
अर्जुनवाडा (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री. मरगाई देवी व श्री. भैरवनाथ मंदिराच्या वास्तुशांती व कलशरोहण सोहळ्यासाठी मंत्री मुश्रीफ गावात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या आया-बहिणीनी त्यांचे पंचारतीने औक्षण करून राख्या बांधल्या.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या ४० वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माता- भगिनींचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. या पुण्याईच्या शिदोरीच्या जोरावरच नेहमीच यशस्वी होत आलो आहे. असेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर राहू द्या, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..!
दुग्धशर्करा योग…
भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा रक्षाबंधन सण. या सणादिवशीच अर्जुनवाडा ग्रामदैवत श्री मरगाईदेवी व श्री. भैरवनाथ मंदिराचा कलशरोहण समारंभ म्हणजेच दुग्धशर्करा योग. असा दुर्मिळ योग जुळून आला. घाईगडबडीतही मंत्री मुश्रीफ यांना माता- भगिनींनी राखी बांधून एक अतूट नाते जपले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









