कणकवली / प्रतिनिधी:
तालुक्यातील ओसरगाव येथील मूळ रहिवासी व हरकुळ खुर्दचे ग्रामविकास अधिकारी धनंजय मधुकर चौकेकर (52) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी कणकवली, कुडाळ तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी म्हणून यशस्वीरित्या काम केले होते.
धनंजय चौकेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गुरुवारी सकाळी खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या ग्रामसेवक पदाच्या कारकीर्दीची सुरुवात लोरे या गावापासून झाली होती. लोरे नंतर त्यांनी साकेडी, सांगवें तसेच कुडाळ तालुक्यातील डिगस येथे ग्रामसेवक म्हणून चांगल्या प्रकारे काम केले. त्यानंतर त्यांना तालुक्यात कलमठ येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून बढती मिळाली होती. सध्याचे हरकुळ खुर्द येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









