सध्या महाराष्ट्रात ग्रा.पं. निवडणुका घेतल्या जात आहेत़ रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हय़ात राजकीय लोकांनी सबुरी ठेवली असून निवडणूक झाल्यानंतर आपले काम करण्याचे ठरवले आह़े
सध्या महाराष्ट्रात ग्रा.पं. निवडणुका घेतल्या जात आहेत़ काही जिह्यांमध्ये निम्म्या ग्रा.पं. तर काही जिह्यात त्याहून कमी ग्रा.पं.च्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जात आहेत़ कोकणातील सर्व जिह्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आह़े
रत्नागिरी जिल्हय़ात 479 ग्रा.पं.साठी निवडणूक होत आह़े निम्म्याहून अधिक ग्रा.पं.मध्ये निवडणुकीचे काम सुरू झाल्याने सर्वच राजकीय लोक त्याकडे लक्ष देऊन आहेत़ ग्रा.पं.निवडणुकीचा उपयोग शक्ती आजमावण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राजकारणी करत असतात़
रत्नागिरी जिल्हय़ाशी संबंधित दोन खासदार आहेत़ त्यापैकी विनायक राऊत हे शिवसेनेचे तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे आहेत़ आमदारांपैकी राजन साळवी, उदय सामंत, भास्कर जाधव, योगेश कदम हे शिवसेनेचे असून शेखर निकम राष्ट्रवादीचे आहेत़ राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आह़े या सरकारमधील पक्षांनी ग्रा.पं. निवडणुकीत जुळवून घेण्याचे ठरवले आह़े त्यामुळे जिल्हय़ातील प्रमुखपणे अस्तित्वात असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीला एकत्रितपणे निवडणुका लढवणे क्रमप्राप्त आह़े रत्नागिरी जिल्हय़ातील खासदार, आमदार व तालुका स्तरावरील नेते या आघाडीशिवाय वेगळा पर्याय नसल्याचे ठासून सांगत आह़ेत त्यामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांना तोच सूर आळवावा लागत आह़े
रत्नागिरी जिल्हय़ात आजवर अनेक गावात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगत आला आह़े या समीकरणांना आजवर हादरे बसले नव्हत़े निवडणुकीत विजय किंवा पराभव हा मुद्दा होत असला तरी कोणता गट कोणाविरुद्ध लढणार हे आधीच स्पष्ट होत़े आताच्या निवडणुकांमध्ये मात्र शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्रित काम करणे भाग पडत आह़े महा आघाडीला उमेदवार देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. ग्रा.पं.मध्ये जागा मर्यादित असून मित्रपक्षासाठी काही प्रमाणात त्याग करण्याची वेळ सेना व राष्ट्रवादीवर आली आह़े दोन्ही पक्षांनी जिल्हा व तालुका स्तरावर समंजसपणा दाखवण्याचा आव आणला आह़े पक्षनेत्यांनी आघाडी कायम राहील अशी अधिकृत भूमिका घेतल्याने काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणे कठीण झाले आह़े अशा लोकांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आह़े काही प्रमाणात गाव पॅनेलमध्ये या लोकांनी प्रवेश मिळवला आह़े नेतेमंडळी सत्तेसाठी आघाडी करतात़ मात्र आघाडी टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांचा राजकीय बळी देतात़ अशा तक्रारी अनेक ठिकाणी करण्यात आल्या आहेत़ यामुळेच बंडखोरी वाढली असलीतरी त्याला नाईलाज आह़े, असे तालुका स्तरावरील नेते म्हणत आहेत़
रत्नागिरी जिल्हय़ात काही वर्षांपूर्वी भाजपची ताकद मजबूत असली तरी आता हा पक्ष तेवढा मजबूत राहिलेला नाह़ी प्रत्येक ग्रा.पं.त उमेदवार देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीला शह देण्याचा विचार या पक्षाने केला आह़े त्यासाठी पक्षाचे प्रांतिक सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण हे सतत दौरे करत आहेत़ रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक जिल्हय़ात जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम ते करत आहेत़ भाजपाच्या अस्तित्वाशिवाय निवडणुका लढवल्या जाणार नाहीत़ याची काळजी पक्षाने घेतली आह़े
रत्नागिरी जिल्हय़ात 479 ग्रा.पं.मध्ये निवडणुका होत आहेत़ यापैकी 119 बिनविरोध होत आहेत़ अर्ज माघारीच्या अखेरच्या †िदवशी 951 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल़े त्यामुळे केवळ 360 ग्रा.पं.मध्ये मतदान होणार आह़े त्यासाठी 4,338 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत़ सिंधुदुर्ग जिल्हय़ात परिस्थिती काहीशी वेगळी आह़े माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नेते या निवडणुकीसाठी काम करू लागले आहेत़ तेथे शिवसेनेशी जोरदार लढत होत आह़े सिंधुदुर्गसाठी काम करणारे खासदार विनायक राउढत हे शिवसेनेचे आहेत तर नितेश राणे हे भाजपचे आमदार असून वैभव नाईक आणि दीपक केसरकर हे शिवसेनेचे आमदार आहेत़ सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना असे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर अधिक आक्रमपणे उतरत असून त्याला राजकीय परिमाणे आणखी घट्ट स्वरूपाची आह़ेत सिंधुदुर्गात गावागावांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सतत कार्यरत आहेत़ या जिल्हय़ांमध्ये सार्वजनिक कामात राजकीय धग कायम जाणवत असत़े त्याचा परिणाम या निवडणुकीतही दिसून येत आह़े सिंधुदुर्गातील भाजपची परिस्थिती रत्नागिरीपेक्षा बळकट आह़े तेथे शिवसेनेला तोंड देण्याकरिता विशिष्ट नेतृत्व उभे राहिले आह़े यामुळे पोलीस प्रशासनावरदेखील अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आह़े या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस विभागाने आवश्यक ती योजना केली आह़े
या निवडणुकीमध्ये अनेक गावात ieeJe He@vesueÜejs उतरण्याचे समंजस लोकांकडून ठरवण्यात आले आह़े या गावांमध्ये राजकीय लोकांना दोन हात दूर ठेवण्यात आले आह़े या निवडणुका संपल्या की नंतर राजकारण करावे पण गावपातळीवर पक्षीय राजकारण आणू नये, असे या लोकांचे म्हणणे आह़े त्याही बाबतीत राजकीय लोकांनी सबुरी ठेवली असून निवडणूक झाल्यानंतर आपले काम करण्याचे राजकीय लोकांनी ठरवले आह़े या निवडणुकीमुळे राजकीय व सामाजिक रचनेची फेरमांडणी होणार हे नक्की आह़े
सुकांत चक्रदेव








