23 अर्ज छाननीत बाद, जेऊरवाडी ग्रा.पं.बिनविरोध
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यामध्ये होत असलेल्या 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबर पर्यंत एकुण 1447 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज ( 31 डिसेंबरला ) या सर्व अर्जांची छाननी झाली असून त्यात 23 अर्ज डबल असल्याने नामंजूर करण्यात आले असून, अंतिम अर्ज 1424 राहिलेले आहेत.
येत्या 4 जानेवारीला उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असून त्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान जेऊरवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. येथे सात जागेसाठी सातच अर्ज दाखल आहेत. उर्वरित किती ग्रामपंचायती बिनविरोध होतील, हेही चित्र 4 जानेवारीला स्पष्ट होईल.
या निवडणुकीत साडे येथे 37, आळसुंदे येथे 17, शेलगाव क. 16, सावडी 38, उमरड 38, पांडे 42, करंजे 34, दिलमेश्वर 21, शेटफळ 36, केडगाव 38, कुगाव 14, पोथरे 53, आळजापूर 43, बिटरगाव श्री 15, मलवडी 24, पाथुर्डी 18, पांगरे 35, कुंभेज 36, जेऊरवाडी 7, कोंढेज 35, श्रीदेवीचामाळ 29, हिवरवाडी 35, रोशेवाडी 17, पाडळी 25, पोटेगाव 14, बाळेवाडी 23, जातेगाव 39, पुनवर 23, मांगी 26, अर्जुननगर 21, मिरगव्हाण23, फिसरे 21, बोरगाव 33, घारगाव 31, वडगाव 31, पिंपळवाडी 23, भोसे 18, निमगाव ह 21, सालसे 22, नेरले 42, हिवरे 21, हिसरे 29, कोळगाव 31, गुळसडी 24, सरपडोह 12, सौंदे 19, देवळाली 63, झरे 30, ढोकरी 26, कविटगाव 23 व सांगवी 19 असे अंतिम अर्ज राहिलेले आहेत.