प्रतिनिधी / सांगरूळ
राज्यात सध्या शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे सरकार सत्तेत आहे .ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुकामध्ये शिवसैनिकांनी सक्रिय राहुण ग्रामपंचायतींच्या सत्तेचे जास्तीत शिवसेनेचा सहभाग नोंदवावा असे आवाहन आण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले. सांगरुळ परिसरातील आमशी, म्हारुळ, खाटांगळे, उपवडे ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून याबाबत आढावा बैठक सांगरूळ येथे झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभी कासारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन निवास वातकर होते.
यावेळी बोलताना संजय पवार यांनी राज्यात महाआघाडीच्या पॅटर्ननुसार सर्व निवडणुका लढवल्या जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ज्या गावात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे तेथे शिवसेनेने जास्तीत जास्त जागा वाट्याला घेऊन सत्तेत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या गावात शिवसेनेची ताकद ज्यादा असेल तेथे शिवसेनेचा सरपंच करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.
यावेळी आण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार कुंभी कासारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन निवास वातकर उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील, तालुकाप्रमुख तानाजी आंग्रे, युवासेना उपजिल्हाअधिकारी अक्षय चाबुक, संताजी पाटील, उपसरपंच सुशांत नाळे, व्ही. जी. पाटील (कोपार्डे) प्रशांत नाळे, ग्रा. पं सदस्य सचिन नाळे, सरदार खाडे, सांगरुळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी नाळे, पोपट मंडगे, विभाग प्रमुख भारत भापकर (हणमंतवाडी), अभिजित खाडे (खाटांगळे) शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.









