वाठार किरोली : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील जनता या कोरोना काळात मेटाकुटीला आली असून, सद्यस्थितीत निवडून आलेल्या अनेक लोकप्रतिनिधीनी जनतेकडे पाठ फिरवल्याने आपले गाऱ्हाणे मांडायचे तरी कोणाकडे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गेल्या वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार गेल्या कडक लॉकडाऊनमध्ये असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली बांधिलकी जपली सर्वसामान्य जनतेचे आदेशाचे पालन काटेकोरपणे केली. ग्रामीण भागातील काही लोकांना लॉकडाऊन म्हणजे काय याचा अर्थ माहित नव्हता आणि नंतर तो समजला तो पाळला.
गेल्या लॉकडाऊनमध्ये गावातील ग्रामदक्षता समितीने गावामध्ये चांगल्या प्रकारे काम केले. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी प्रयत्न केले. पंरतू आता अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सर्व सदस्य आहेत. त्यांना गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावात कोणकोणत्या उपाय योजना राबवाव्यात याची कल्पनाही नाही. त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामदक्षता समिती पुन्हा ॲक्टिव्ह करण्याची गरज असून त्यांना तातडीने प्रशिक्षण देण्याची गरज आहे. गावातील लोकांचे आरोग्य विषयी काय उपाय योजना राबविल्या कशा प्रकारे गावात कोरोना विषयी जनजागृती होते, याची दखल घेवून गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लोकप्रतिनिधींनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामान्य जनता करीत आहे.









