प्रतिनिधी / येळ्ळूर
संमेलनातील ग्रंथदिंडी ही नेहमी आकर्षक ठरत आहे. यावषीही ढोलताशा ध्वज पथकाने तसेच बालचमूंच्या विविध पोशाखानी ग्रंथदिंडीने महाराष्ट्रीयन आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. ही ग्रंथदिंडी पाहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
ग्रंथदिंडीचे पूजन संमेलनाध्यक्ष उद्धव कांबळे, उद्योजक सुधीर दरेरकर, लिलावती मेणसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भजनाच्या निनादात, ढोलताशांच्या वाद्यातून ग्रंथदिंडी निघाली. यामध्ये मुलांनी विठ्ठल-रखुमाईपासून विविध पोशाख परिधान केले होते.
शिवमुद्रा, कडोली ढोलताशा पथक हे ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले होते. नवहिंद भवन, श्रमिक सोसायटी, शिवसेना, सैनिक को-ऑप. सोसायटी, नवहिंद मल्टीपर्पज को-ऑ. सोसायटी, न्यू सैनिक सोसायटी, नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी, स्वामी विवेकानंद को-ऑप. सोसायटी, न्यू नवहिंद मल्टीपर्पज सोसायटी, येळ्ळूर ग्राम पंचायत, शिवाजी विद्यालय, ब्रह्मलिंग सोसायटी यांनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले.
ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीचे पूजन एपीएमसीचे माजी अध्यक्ष आप्पा जाधव यांच्या हस्ते झाले. या ग्रंथदिंडीमध्ये महिला कलश, तुळशी घेऊन सहभागी झाल्या होत्या. साहित्य संमेलनामुळे एक वेगळेच वातावरण गावात निर्माण झाले होते. या ग्रंथदिंडीमध्ये जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, मराठा बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका निकिता पावशे, माया मजूकर, प्रतिभा घाडी, सुरेखा डी. पाटील, जानकी चिठ्ठी, उज्ज्वला कुगजी, नयन उघाडे, येळ्ळूर विभाग म. ए. समिती अध्यक्ष शांताराम कुगजी, एल. आय. पाटील, नवहिंद अध्यक्ष शिवाजी सायनेकर, व्हा. चेअरमन परशराम घाडी, नवहिंद सोसा.चे चेअरमन उदय जाधव, ग्रा. पं. सदस्य राजू पावले, म. ए. समिती कार्याध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, कॉ. आनंद मेणसे, ऍड. नागेश सातेरी, ऍड. शाम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, तानाजी हलगेकर, मुकुंद घाडी यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थांनी भाग घेतला होता.









