उपक्रम हाती घेण्यावर सभेत एकमत
प्रतिनिधी /बेळगाव
येथील गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर-बेळगाव या समाजसंस्थेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 6 मार्च रोजी सायंकाळी सिटी हॉल, भाग्यनगर क्रॉस नं. 2 येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सुनील नाईक होते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष आनंद वेलंगी, सेपेटरी राघव हेरेकर, खजिनदार विकास कब्बे आणि विश्वस्त आशा नाडकर्णी उपस्थित होत्या.
प्रारंभी गेल्या वार्षिक सभेनंतर निधन पावलेल्या समाजातील बंधू-भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली. सेपेटरी राघव हेरेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. उपस्थितांनी त्याला संमती दिली. वार्षिक जमा-खर्च आणि अहवालालाही मंजुरी देण्यात आली. वार्षिक अंदाजपत्रकही संमत करण्यात आले.
अध्यक्षांनी आपल्या मनोगतात कोरोना काळातही मासिक सभा घेऊन संस्थेचे अनेक उपक्रम समाजबांधवांच्या सहकार्यामुळे पार पाडल्याचे सांगितले. आगामी काळात हाती घ्यावयाच्या उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली.
या सभेला उपाध्यक्षा यशश्री देशपांडे, उपकार्यवाह संदीप कोलवालकर, ज्येष्ट विश्वस्त प्रा. अनिल पाटणेकर, बालमुकुंद पतकी, श्रीनाथ देशपांडे, ‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री, कार्यकारिणी सदस्य, सारस्वत महिला मंडळाच्या अध्यक्षा विनिता नाईक, संध्या सडेकर, उमा शहापूरकर, शुभा गिंडे, अपर्णा वेलंगी, शिल्पा कर्नाटकी, रेखा सामंत, चित्रा वेलंगी, श्रद्धा कर्नाटकी, अनिता कामत आणि कायम निमंत्रित यासह बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.