नवी दिल्ली
बजेटमध्ये विमान प्रवास घडवून आणणारी गो एअरलाईन्स (गो फर्स्ट)यांचा लवकरच आयपीओ दाखल होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी बाजारातील नियामक सेबीने मंजुरी दिली आहे. सध्या ही कंपनी गो फर्स्ट या नावाने ओळखली जाते. कंपनी आयपीओतून 3600 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओकरिता कंपनीने मंजुरीसाठी मे मध्ये सेबीकडे रितसर अर्ज सादर केला होता.









