मुंबई
हवाई क्षेत्रात कार्यरत असणाऱया गो एअर कंपनीचा आयपीओ आणण्याचा विचार आहे. सदरचा आयपीओ याच वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय भांडवली बाजारात सादर करण्यात येणार आहे. कंपनी सदरच्या आयपीओतून 3 हजार 600 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओ सादर करण्याआधी आवश्यक परवानगीसाठी सेबीकडे अर्ज करण्यात आला असल्याचे समजते. आयपीओतून मिळणाऱया रक्कमेपैकी 55 टक्के रक्कमेचा वापर कर्ज चुकवण्यासाठी केला जाणार आहे. गोएअरने येत्या काळात आपल्या महसुलात 7 टक्क्यावरून 20 टक्केपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.









