ऑनलाईन टीम / मुंबई
एनसीबीचे(NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे केपी गोसावी (K.P.Gosavi)या खाजगी गुप्तहेराबरोबरचे फोटो व्हयरल झाले आहेत.त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबर रोजी क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर के.पी.गोसावी याचा आर्यन खानसोबतचा (Aryan Khan)सेल्फी व्हायरल झाला होता. त्यानंतर वानखेडे यांचे केपी गोसावी सोबत अनेक प्रतिमा समोर आल्या आहे
फोटोमध्ये समीर वानखेडे आणि केपी गोसावी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींसोबत एका खोलीत दिसत आहेत. या प्रकरणातील साक्षीदार गोसावी हा फरार असुन केपी गोसावी आणि त्याचा वैयक्तिक अंगरक्षक प्रभाकर साईल यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटही समोर आले आहे. “हाजियालीला जा. मी सांगितलेले काम पूर्ण करा. घरी परत या. दरवाजा बंद करा आणि खिडकीतून हॉलच्या आत चावी टाका” असे के.पी. गोसावी प्रभाकर साईलला सांगत असुन हे चॅट ३ ऑक्टोबरचे आहेत.
सोमवारी, क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) ने आरोप केला की त्याने गोसावी आणि सॅम डिसूझा यांनी आर्यनला तपासापासून दूर ठेवण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या खंडणीबद्दल बोलताना ऐकले.गोसावी यांनी साईलने केलेल्या खंडणीचे दावे फेटाळून लावले आहेत. पण प्रभाकर साईलने असा दावाही केला आहे की त्यांनी गोसावीला शाहरुख खानच्या (shahrukh khan)व्यवस्थापकाला भेटताना पाहिले होते. प्रभाकर साईलने क्रूझच्या छाप्यांनंतर आर्यन खानला वानखेडे यांच्या उपस्थितीत 9-10 कोऱ्या पानांवर सही करण्यास के.पी. गोसावी यानेच सांगितले होते.
Previous Articleजबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
Next Article साताऱ्यात ऑक्सिजनही उदयनराजे यांच्यामुळे येतो








