वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाला होणारं नुकसान पाहता सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. देशात 31 मार्च 2020 पासून भारत स्टेज 4 म्हणजे BS-IV वाहनांची विक्री पूर्णपणे बंद करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. कोर्टाच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय प्रदूषणही आटोक्मयात येईल. देशात 1 एप्रिल 2020 नंतर भारत स्टेज-6 प्रकारच्या इंजिनचा वापर अनिवार्य असेल.
एप्रिल 2017 मध्ये BS-IV वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती.
भारतात BS-IV वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कारच्या किंमतीत एक ते दीड लाख रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे. केवळ याच आधारावर किंमती वाढणार नाहीत. कारण, एक्स्चेंज रेट, कोळशाची किंमत आणि वाहतुकीच्या खर्चावर नवे दर ठरवले जातात. BS-IV आल्यानंतर कार कंपन्यांना नव्या गाडय़ा बनवण्यासाठी खर्च वाढणार आहे. पर्यावरणाचे नवे नियम आल्यानंतर कोळशावर चालणाऱया पॉवरप्लांटसाठी वीज दर 40 ते 50 पैसे प्रति युनिट वाढण्याची शक्मयता आहे. तर वाहनांचं इंधन 70 पैसे प्रति लिटर महाग होऊ शकतं. बीएस म्हणजेच भारत स्टेज इंधनाची गुणवत्ता आणि वाहनांमधून निघणाऱया धुरासाठी कायदे आहेत आणि ते पाळणं वाहन निर्माता कंपन्यांना अनिवार्य आहे.
सध्याच्या वाहनांचं काय होईल?
देशात BS-IV वाहनांची विक्री अगोदरच सुरु झालेली आहे. कार कंपन्यांच्या मते, तुमच्याकडे BS-IV मानक असलेल्या इंजिनची गाडी असेल तर चिंता करण्याचं कारण नाही. यामध्ये BS-IV प्रकारच्या इंधनाचा वापर कोणत्याही अडथळय़ाविना करता येऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला इंजिन वगैरे बदलण्याची गरज नाही.









