गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी
गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) च्या अध्यक्षपदी.मोहन पंडितराव तर उपाध्यक्षपदी.दिपक चोरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) संचालक मंडळाच्या आज मंगळवार दिनांक 12 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सन 2021- 22 सालासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मोहन पंडितराव, उपाध्यक्ष म्हणून. दिपक चोरगे, मानद सचिव म्हणून . नितीनचंद्र दळवाई व खजिनदार म्हणून स्वरूप कदम यांची निवड करण्यात आली.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी राजीव परीख होते.
माजी अध्यक्ष. श्रीकांत पोतनीस यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामाचा आढावा घेतला व संचालक मंडळाचे आभार मानले .
संस्थेच्या वतीने उद्योजकांच्या अडचणी सोडवणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेचे काम केले जाईल , संस्थेच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सेंटर ऑफ एक्सैलेन्स चे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. असे नूतन अध्यक्ष मोहन पंडितराव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी श्रीकांत पोतनीस, सचिन शिरगावकर, अजित आजरी, लक्ष्मीदास पटेल, सुरजतसिंग पवार, जे.आर.मोटवाणी, रणजीत पाटील, संजय देशिंगे, सुनील शेळके, प्रसाद गुळवणी,अजय कुलकर्णी, प्रशांत मेहता, अमोल यादव, रणजित मोरे, मंगेश पाटील, वसंत सुतार, ओमकार मोरे, प्रतापराव इंगळे, अक्षय शहा उपस्थित होते.