आरोग्य विभागामार्फत बसस्थानकात 24 तास तपासणी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी बसस्थानकात आरोग्य विभागातर्फे परराज्यांतून येणाऱया प्रवाशांची कोविड चाचणी केली जात आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागामार्फत 24 तास परराज्यांतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार मागील काही दिवसांपासून बसस्थानकात ही तपासणी सुरू आहे. कर्नाटक शासनाने कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर चेकपोस्ट नाके उभारले आहेत. या ठिकाणी येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र गोवा राज्यातून येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआरची सक्ती नाही. मात्र बसस्थानकात आल्याने कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. गोव्यातून बेळगाव बसस्थानकात येणाऱया प्रवाशांची कोविड चाचणी केली जात आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना मुभा दिली जात असली तरी एक डोस घेतलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर आणि रॅपिड स्टेट केली जात आहे.









