अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई : एलएसडी, कोकेन केले जप्त : नायजेरियनाला 6 दिवसांची कोठडी
प्रतिनिधी / पणजी
अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हरमल येथे केलेल्या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रिमांडसाठी संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आंतोनियो नवादीयालोर ओबिन्ना (42 वर्षे) असे त्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो गोव्यात भाडोत्री खोलीत राहत होता. गुरुवारी रात्री 10.45 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
हरमल समुद्र किनाऱयावर ड्रग्जची विक्री करण्यासाठी एक नायजेरियन व्यक्ती येणार असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळपासूनच पोलीस सापळा रचून बसले होते. संशयित ठरलेल्या वेळेपेक्षा उशीराच ठरलेल्या ठिकाणी आला. तो ड्रग्सची विक्री करत असतानाच त्याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 10.017 ग्रॅम एलएसडी, 48.688 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. एएनसीचे अधीक्षक महेश गावकर, निरीक्षक सुरज नाईक, सिताकांत नाईक उपनिरीक्षक रोहन मडगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. उपनिरीक्षक प्रियांका सावंत याचा पुढील तपास करीत
आहे.
सीआयडीची टीमही तत्पर
गोव्यातील ड्रग्ज प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस खात्यात विशेष अमली पदार्थ विरोधी विभाग (एएनसी) आहे. तरीसुद्धा अमली पदार्थ विरोधातील मोहीम अधिक कडक करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागातील (सीआयडी) एक विशेष टीमला केवळ अमली पदार्थांच्या विरोधातच काम करण्यास वरिष्ठ अधिकाऱयांनी बजाविल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. या टीममध्ये दोन निरीक्षकांचा समावेश आहे.
रेव्ह पाटर्य़ांमधून ड्रग्जचा व्यववहार अधिक
राज्यात होणाऱया रेव्ह पाटर्य़ांमधून ड्रग्जचा व्यवहार मोठय़ाप्रमाणात होत आहे. अशाच प्रकारची एक पार्टी सीआयडी पोलीस टीमने उधळून लावली होती. तसेच अनेकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच पार्टीत सुमारे 9 लाख रुपये किमतीचा ड्रग्जही जप्त केला होता.









