सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे सहकार्य
ओटवणे / प्रतिनिधी:
गोवा बांबुळी रुग्णालयात एका शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या सावंतवाडीतील एका रुग्णाला दोन ए पॉझिटिव्ह रक्ताची तात्काळ गरज असल्याचे सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे लक्ष वेधताच या रुग्णाला तात्काळ दोन रक्त दाते उपलब्ध करून युवा रक्ताचा संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. सावंतवाडीतील या मंगेश मेस्त्री यांच्यावर आज शुक्रवारी गोवा बांबुळी रुग्णालयात शस्त्रक्रिया करायची असून त्यांना तात्काळ दोन ए पॉझिटिव्ह रक्तदात्यांची गरज होती. याबाबत मेस्त्री कुटुंबियांनी युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी यांच्याशी संपर्क साधताच त्यानी माजगाव येथील बंटी कासार यांच्यामार्फत गोव्यातील दोन दाते तात्काळ उपलब्ध करून दिले. रक्तदान केलेले गोव्यातील रुपेश कांबळी व संतोष शिंदे हे दोन्ही युवक गोवा वेर्णा येथील कोकाकोला कंपनीत कामाला आहेत. या दोघांनी स्वतःच्या वाहनाने बांबुळी रुग्णालय गाठून रक्तदान केले. या दोन्ही युवकांनी यापूर्वीही रक्तदान केलेले आहे. या दोघा रक्तदात्यांचे तसेच युवा रक्तदाता संघटनेचे मेस्त्री कुटुंबियांनी आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









