सांगेत आदिवासी संशोधन केंद्र : फर्मागुडीवर आदिवासी संग्रहालय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यातील आदिवासी समाजाने गोव्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या समाजासाठी गोवा सरकारतर्फे पर्वरी येथे आदिवासी भवन उभारणार आहे व त्याची पायाभरणी 13 ऑगस्ट रोजी केली जाईल, अशी माहिती डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगावात बोलताना दिली.
जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, गोमंतक गौड मराठा समाजाच्या जमिनीचा वापर भवनाच्या बांधकामासाठी केला जाईल. या भवनमध्ये समाजाने पुरवलेल्या सुविधा तसेच आदिवासी आयोग, आदिवासी विभाग आणि आदिवासी महामंडळाची कार्यालये असतील. तसेच विद्याथ्या¥साठी हॉस्टेल सुविधाहि उलपब्ध केली जाणार आहे.
पुर्वीच्या सरकारांच्या दुर्लक्षामुळे विलंब
गेली कित्येक वर्षे आदिवासी भवनचा प्रस्ताव मार्गी लागला पाहिजे होता. परंतु, त्यावेळच्या सरकारांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाहि. त्यामुळेच आदिवासी भवन प्रकuपाला विलंब झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सांगेत संशोधन केंद्र, फर्मागुडीत संग्रहालय
केंद्र सरकारने गोव्यासाठी मंजूर केलेले आदिवासी संशोधन केंद्र पुढील 2 ते 3 माfहन्यांत सांगे नगरपालिकेच्या सहकार्याने सांगे येथे स्थापन केले जाईल. तसेच फर्मागुडी येथील पर्यटन विभागाच्या मालकीच्या जागेत आदिवासी संग्रहालय उभारले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. वन हक्क कायद्यांतर्गत प्रलंबित प्रस्ताव जलदगतीने मार्गी लावले जातील, त्यासाठी स्थानिक लोकांनी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे, गोवा आदिवासी आयोगाचे अध्यक्ष रमेश तवडकर, माजी अध्यक्ष प्रकाश वेळीप, डॉ. उत्कर्ष बेतोडकर, डॉ. मधु घोडकिरेकर, माजी आमदार गणेश गांवकर, अरविंद खुटकर, त्रिवेणी वेळीप व दुर्गादास गावडे यांची उपस्थिती होती.
आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरावी
माणसाची प्रगती केवळ शिक्षणातtनच होत असते, त्यामुळे आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरली पाहिजे. जर पदरी शिक्षण असेल तर आपण आपले उद्दिष्ठ गाठू शकतो असे उद्गार यावेळी आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
आदिवासावर नोकरीत बढतीवेळी अन्याय
आदिवासी समाजावर सरकारी नोकरीत बढती होताना अन्याय होत असतो. मात्र, आत्ता या समाजावरील अन्याय काहि प्रमाणात कमी झालेला आहे. आदिवासी आयोग अशा प्रकरणात लक्ष घालून सरकारला निर्णय घेण्यास भाग पडत असल्याचे मंत्री गावडे म्हणाले. समाजाने एकजूट दाखविल्यास समाजाची प्रगती होण्यास विलंब लागणार नसल्याचे मतहि त्यांनी मांडले.
या कार्यक्रमात डॉ. उत्कर्ष बेतोडकर आणि अरविंद खुटकर यांची प्रमुख भाषणे झाली. डॉ, मधु घोडकिरेकर यांनी ‘कोणीहि मागे राहणार नाहि’ या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी कालिदास भोमकर, अनिल माकेकर, रlनाकांत वेळीप आणि आणखी दोघांचा सत्कार करण्यात आला.









