पहिल्या न्यायमूर्ती म्हणून दुर्गा मडकईकर यांची नियुक्ती
प्रतिनिधी /पणजी
पोस्को कायद्याखाली गोव्यात पहिल्याच खास जलद कृती न्यायालयाची स्थापना करण्यात आली असून न्या. दुर्गा मडकईकर यांना या न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत.
गोवा बाल कायद्याखाली खास बाल न्यायालय आहे. हा कायदा गोवा पुरताच मर्यादित आहे. संपूर्ण भारतभर लागू झालेला प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सीस (पोस्को) या कायद्याखाली सुद्धा खास न्यायालय स्थापण्याची आवश्यकता आहे पण गोव्यात याची स्थापना झाली नव्हती. आता दोन्ही कायद्याखाली गुन्हे एकाच न्यायालयात सुनावणीस येणार असून आता 16 ते 18 वयोगटातील मुलांवर होणाऱया अत्याचाराविरुद्ध या न्यायालयात आरोपपत्र सादर करता येणार आहे. गोवा बाल न्यायालयात फक्त 16 वर्षाखालील मुलांचाच प्रश्न विचाराधीन होऊ शकतो. या नव्या पास्को न्यायालयाची निर्मिती उच्च न्यायालयाच्या मान्यतेने झाली आहे.









