प्रतिनिधी/ काणकोण
गोव्यातून कर्नाटकात बेकायदा दारू घेऊन जाणारी कार माजाळी चेकनाक्यावर अडवून सदर वाहनातील भारतीय बनावटीची 1 लाख 45 हजार रु. किमतीची देशी दारू पकडण्यात आली. या चेकनाक्यावर कारवारचे अबकारी निरीक्षक पी. के. हळदणकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
हळदणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजाळी चेकनाक्यावर गोव्यातून रात्रीच्या वेळी येणाऱया सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाते. त्यावेळी एक वाहन दारूसहित पोळे चेकनाक्यावरून सुटले असल्याची माहिती मिळताच सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या मागच्या सीटवर झाकून ठेवण्यात आलेल्या दारूच्या बाटल्यांच्या पिशव्या आढळल्या. तपासणीसाठी वाहन थांबविताच कारमधील चालकाने पळ काढला. सध्या पकडलेला माल आणि सदर वाहन माजाळी चेकनाक्यावरील अबकारी खात्याच्या ताब्यात आहे.









