गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंटचे ऍड. ह्दयनाथ शिरोडकर आणि महेश म्हांबरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील सध्याचे ज्वलंत विषय खासकरुन म्हादईचा विषय, मोले अभयारण्य, कोविड बाबतची राज्यातील स्थिती हे सर्व विषय घेऊन आम्ही राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. या संदर्भातील निवेदन देखील आम्ही राज्यपालांना दिले आहे. आपण स्वतःह या विषयात लक्ष घालणार असे आश्वासन देखील राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यावेळी आम्हाला दिले. अशी माहीती गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंटचे ऍड. ह्दयनाथ शिरोडकर यांनी दिली.
दोनापावला, राज भवन येथे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना भेटून आल्यानंतर ऍड. ह्दयनाथ शिरोडकर पत्रकारांशी संबोधताना वरील माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत महेश म्हांबरे उपस्थित होते.
म्हादई, मोले अभयारण्य, कोरोना हे सध्या गोव्यातील महत्वाचे विषय आहे. यावर सरकारला कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नाही आहे. सरकारच्या हाताबाहेर सर्व परीस्थिती गेली आहे. परंतु गोव्याला गोव्यावर प्रेम करणारा, गोव्याचे हीत जपणारा राज्यपाल मिळाला आहे. त्यामुळे राज्यपाल सदर विषय सांभाळू शकतात असा विश्वास ऍड. शिरोडकर यांनी राज्यपालांना भेटून आल्यानंतर व्यक्त केला.
आमची राज्यपालांशी सकारात्मक दृष्टय़ा चांगली बैठक झाली आहे. त्यांना भेटल्यानंतर ते खरेच गोव्याचे हीत जपणारे आहे अशी प्रचिती आली. जवळपास 18 ते 20 पानांचे निवेदन आम्ही त्यांना दिले होते, आणि आमच्या पुढय़ातच त्यांनी हे निवेदन वाचून या अनेक विषयावर सविस्तर चर्चा केली. आम्ही जेव्हा मोले अभयारण्यात येणाऱया प्रकल्पांबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी स्वतः आपण या भागात फिरुन आढावा घेतल्याचे सांगितले. त्यामुळे ते गोव्याबद्दल किती गंभीर आहे हे दिसून येते. राज्यपालांनी आमच्यासारख्या युवांना भेट देऊन आमचा विषय एwकून घेतल्याबद्दल त्यांचे खुप आभारी आहोत. दरम्यान आम्ही त्यांना वरील विषय केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यात यावे अशी विनंती केली. असे महेश म्हांबरे यांनी सांगितले.









