प्रतिनिधी /पणजी
भारत सरकारने राज्यांना योजनाबद्ध कर्ज घेण्यास दिलेल्या मान्यतेनुसार गोवा सरकारने 200 कोटीचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. हे कर्जरोखे 10 वर्षांच्या मुदतीसाठी आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या फोर्ड मुंबई कार्यालयाच्या माध्यमातून लिलावाद्वारे या सरकारी स्टॉकची विक्री करण्यात येणार आहे. उद्या दि. 7 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे.
यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात बोली सादर करता येणार आहे. स्पर्धात्मक प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सादर करावे लागतील. गैरस्पर्धात्मक प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोअर बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सादर करावे लागतील. लिलावाचा निकाल रिझर्व्ह बँकेकडून त्याच दिवशी त्यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल. यशस्वी बिडर्सनी दि. 8 सप्टेंबर रोजी बँकेची वेळ संपण्यापूर्वी रोख, बँकर्स चेक, पे ऑर्डर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट मुंबई येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्ट द्वारे पैसे भरावे. या कर्जाची परतफेड दि. 8 सप्टेंबर 2031 रोजी सममुल्याने करण्यात येणार आहे. दरम्यान, गत जून महिन्यात राज्य सरकारने 100 कोटींचे कर्जरोखे विक्रीस काढले होते.









