ऑनलाईन टीम / गोवा
गोव्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ४० म्हणजेच सर्व मतदार संघात जोरदार तयारी सुरु झाली असून उमेदवार निश्चित झाल्याने यापूढे प्रचारासाठी उमेदवार मतदारांना भेटतील आणि आपण येत्या काळात गोवावासियांना कोणत्या घटकावरुन विकासाकडे घेऊन जाणार आहोत या बद्दल गोव्यातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
सद्या विधानसभा निवडणूकीची तयारी सर्व मतदारसंघात सुरू झाली असल्याने प्रत्येक कार्यासाठी गोमंतकीयांचा ही उदंड प्रतिसाद मिळतो आहे. कारण गोमंतकीय ही काही समस्यांनी ग्रासले आहेत. बेरोजगारी, खणीज उत्खणन, भ्रष्टाचार यांसारख्या मुद्यावरुन त्यांना आपले नेतृत्व निवडायचं आहे.
गेले काही वर्षे म्हणजेच 2012 ते 2022 पर्यंत भाजप सरकार स्थिर सरकार ठरले आहे. तसेच येत्या काळात भाजप सरकार स्थैर्य आणि विकासाच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे ही भाजप नेत्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच यंदाच्या निवडणूकीत भाजप जिंकेल असा विश्वास ही भाजप नेत्यांनी यावेळी स्पष्ट केला आहे.