क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
आग्रा-उत्तरप्रदेश येथे 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी गोवा मुला-मुलींच्या संघाची निवड करण्यात आली. हे संघ शुक्रवारी आग्य्राला रवाना झाले. कोविड महामारी दरम्यानचा गोवा संघाचा हा पहिलाच दौरा आहे.
निवडण्यात आलेले संघ पुढीलप्रमाणे : मुलगे-लक्ष्मण नाईक, वेदांत सावंत, यश आनंद, मुथाना कारभार, मनोज हडीमनी, विराज वायंगणकर, सागर गावडे, प्रथमेश कुंकळकर, स्मीतेश सावंत, विनोद पुजारी, अजय हळगेकर, निखील कुबल, दर्शन खोलकर, रोहित मांग, राजू गुरुडकर, श्रीराम मळीक. मुली : क्षितीजा देसाई, हर्षदा राणे, मिनाक्षी अगालीकेरी, प्रणिता राणे, सोनम म्हाळशेकर, नम्रता घाडी, संतोषी सिनारी, नम्रता सावंत, पूजा बिसकर्मा, मनिषा फडते, इशा भोमकर, कनक्षा गावडे, आरती कुरतरकर, मनीषा शिंदे, अक्षदा नाईक, प्रियांका तांबुळकर.
शुभेच्छा देण्यासाठी टेनिसबॉल सचिव रुपेश नाईक, चंद्रपाल वर्मा, साग प्रशिक्षक हरेश पार्सेकर, अजिंक्य नाईक उपस्थित होते.









