दोडामार्ग नाक्मयाला दिली भेट
डिचोली/प्रतिनिधी
नियम धब्यावर बसवून काही लोक महाराष्ट्रातून गोव्यात येत असून पोलिसांनी कडक पहारा ठेवून एकही इसम बेकायदेशीर पणे घुसखोरी करणार नाही याची खबरदारी घ्या प्रत्येकाच्या हितासाठीच हा निर्णय असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी आज सकाळी दोडामार्ग सीमेवर भेट दिली या वेळी सभापती राजेश पाटणेकर उपअधीक्षक गुरुदास गावडे पोलीस निरीक्षक संजय दळवी साळ चे सरपंच घंनश्याम राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते
अनेक लोक चोरी चोरी चुपके गोव्यात घुसत असून हे धोकादायक आहे एक दोन इसम दूध घेऊन येतात त्यांनाही मुख्यमंत्र्यानी 3 मे पर्यं त बंद करून बोर्डरवरच दूध घेण्याची व्यवस्था करा असा आदेश दिला.
गोवा सुरक्षित असला तरी अनेक महिने काळजी घेणे गरजेचे असून हे प्रत्येक माणसाच्या हितासाठीच आहे त्यामुळे गोवा भूमीत प्रवेश करताना सर्व बाजूनी तपास हा सक्तीचा करण्यात आलेला असून लोकांच्या हितासाठीच हा कडक निर्णय आहे कुणीही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी पोलिसांना सक्तीने सर्व गोष्टी करण्याचे आदेश दिले.
सभापती राजेश पाटणेकर यांनी खोलपेवाडी व इतर लोकांना या ठिकाणी बंद केल्याने अडचण होते असे सांगितले. त्यावेळी या बाबत स्थानिक लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश डॉ सावंत यांनी दिले. राज्यातील सर्व च ठिकाणी खबरदारी घेणे गरजेचे असून सद्या तीन मे पर्यंत कडक धोरण असेल असे मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.