प्रतिनिधी / वाळपई
बेळगाव जिल्हात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पाश्वभूमीकर केरी सत्तरीतील नागरिक दक्ष झाले आणि त्यांनी केरी सत्तरीतून बेळगावातील भाजीपाला बंद करण्याची मागणी केली होती. सरकारने भाजीपाला हा अत्यावश्यक असल्याने केरीवासीयांची मागणी मान्य केली नव्हती. पण येथून येणाऱया भाजीपाला वाहनांची संख्या मात्र कमी झाली होती. केरीवासीय आपली वाहने भाजीपाला आडण्यासाठी बेळगावात नेतही नाहीत. एकाबाजूने केरीवासीयांची कोरोनाच्या प्रतिबंधासाठी दक्ष असताना केरी भागात रस्त्याकडेला भाजीपाला टाकल्याच्या घटना घडत असल्याने येथील नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज सकाळी येथील घोटेली 2 येथील पुलावर 4 पोती मिर्ची व 3 पोती कोबी रस्त्याकडेला टाकलेल्या आढळल्या. ही सर्व चांगली भाजी होती. बेळगावातून केरी मार्गे आणलेला भाजीपाला दुकानांना पुरवून राहिलेली अशी भाजी या ठिकाणी टाकली गेली असावी असा कयास उपस्थितांनी काढलेला आहे. अन्यातानी मंगळवारी रात्री हे कृत्य केले आहे.
दरम्यान या प्रकाराबद्दल केरीतील नागरिकांत नाराजी व्यक्त केली जाते. यासंबंधी घोटली 2 चे पंच सदस्य लक्ष्मण गावस यांनी सांगितले की बेळगावातून कोरोनाचा प्रसार केरीत होऊ नये म्हणून आम्ही केरीवासीय दक्ष राहतो. बेळगावातून येणाऱया वाहतूकीव्दारे कोरोनाचे जिवाणू येण्याची शक्मयता असल्याने आम्ही वाहतुकीवर बंधन आणण्याची मागणी करीत आहेत. पण सरकारने अशी वाहतूक बंद करण्याऐवजी सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने अशा वाहनाव्दारे राहिलेले भाजीपाला रस्त्याकडेला टाकला जात आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर आहे व पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आपला गोवा कोरोना मुक्त राहण्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करीत आहोत. अशा या टाकलेल्या भाजीपाल्याव्दारे कोरोना संक्रमण होण्याची शक्मयता असल्याने आमच्या प्रयत्नांवर पाणी पेरले जाणार आहे तेव्हा सरकारने यावर गांभीर्याने घ्यावे असे सांगितले.
आज सकाळी जेव्हा हा प्रकार समाजाला तेव्हा स्थानिक पंच लक्ष्मण गावस यांनी पुढाकार घेऊन सरपंच गोविंद गावस व पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले व अशा प्रकारावर बंदी आणण्याची मागणी केली.









