बांदा/प्रतिनिधी-
गोव्याहुन बांद्याच्या दिशेने गोवा बनावटीची दारू पायी घेऊन जाणाऱ्यावर बांदा पोलिसांनी कारवाई केली.यात सात हजार दोनशे रुपयाची दारू सटमटवाडी टोलनाका येथे जप्त केली. तर उमेश उत्तम गडकरी (चांदेल-गोवा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. हि कारवाई सहा निरीक्षक अरुण जाधव, पो कॉ राजेंद्र शेळके, किरण कांबळी, धनंजय गोळे, प्रथमेश पोवार यांनी केली.