ऑनलाईन टीम/तरुण भारत
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमनातरी ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभा निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. तृणमूल काँग्रेस बहु-सांस्कृतिक आणि बहु-धार्मिक राज्याचा पुरस्कर्ता आहे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच त्यांनी गोवा निवडणुकांसाठी टीएमसीचा नवा अर्थ सांगितला आहे.
गोव्यातील भाजपाच्या राजवटीला आपला पक्ष हा एकमेव पर्याय असल्याचाही दावा त्यांनी केला. पणजीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ममता म्हणाल्या, “टीएमसी म्हणजे टेम्पल(मंदिर), मशीद आणि चर्च”. पंतप्रधान मोदी वाराणसीत काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करत असताना बॅनर्जींनी हे वक्तव्य केले आहे.