प्रतिनिधी/ फोंडा
फर्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रीकल ऍन्ड इलेक्ट्रोनिक विभागात सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) म्हणून नियुक्ती करण्यात आलेले अवडयप्पन नारायणी यांच्या निवड प्रकियेत गोवा लोकसेवा आयोगाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचा दावा येथील काही प्राध्यापकांनी केला आहे. नियमित अनुभव, पीएचडी, आणि एम टेकची नियमित पुर्णता करण्याबाबतीत उमेदवाराने पदासाठी निवड होण्यासाठी अर्जात चुकीची माहिती सादर केली आहे. या गदारोळात महाविद्यालयाचे प्रचार्य यांनीही राजीनामा दिल्याने या वादाला वेगळेच वळण मिळाले आहे.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात अवडयप्पन नारायणी यांची 7 डिसेंबर 2020 रोजी सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झालेली आहे. जीपीएससीची जाहीरात 13 सप्टे. 2019 रोजी काढली होती. या प्रकियेत त्यांनी गोवा लोकसेवा आयोगाची दिशाभूल केल्याच्या अनेक बाबी माहिती हक्क कायद्यातून मिळवलेल्या कागदपत्रातून स्पष्ट झालेल्या आहेत. त्याच्या नियुक्तीत अनेक त्रुटी असून त्याच्या सर्व कागदपत्राची शहनिशा व्हावी अशी मागणी काही प्राध्यपकांनी केली आहे.
सहा वर्षाच्या अनुभवात तफावत
नारायणी यांनी पीएचडी पुर्ण केल्याचा दावा केलेल्या अण्णा विद्यापीठातून त्याच कार्यकाळात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही अनुभव जोडलेला आहे. जीपीएसीनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडलेले उमेदवार सहा वर्षापासून अध्यापनाचे सहकारी म्हणून कार्यरत असणे गरजेचे आहे. नारायणी हे अध्यपनाचे सहकारी नसून एक टीचींग फेलो म्हणून कार्यरत होते. सहाय्यक प्राध्यपकांच्या बरोबरीने अध्यापनाचे सहकारी म्हणून आयोगाने त्य़ाच्या सहा वर्षाच्या अनुभव कसा गाहय़ धरला यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. टिचिंग फेलो या अनुभवाचा दावा करून त्या उमेदवारांने सहाय्यक प्राध्यापक म्हणून मान्यताप्राप्त अनुभव म्हणून फसवा दावा केला आहे.
सहयोगी प्राध्यापकांच्या निवडीसाठी टिचिंग फेलोचा अनुभव कसा ?
एआयसीटीच्या मार्गदर्शक सुचनानुसार टिचींग फेलो असे म्हणून कोणतेही पद अस्तित्वात नाही. अशी नियुक्ती सहाय्यक प्राध्यापक म्हणून समतुल्य मानली जाऊ शकत नाही, म्हणूनच या कालावधीतील त्याचा अनुभव ग्राहय़ धरणे शक्य नाही. सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) पदाच्या निवडीसाठी टीचींग फेलोचा अनुभव सहाय्यक प्राध्यापकांच्या बरोबरीचा दावा करून उमेदवाराने जीपेएसीला पुर्णपणे चुकीची माहिती दिलेली आहे.
क्रमांक 7 ऐवजी क्रमांक 6 वर प्रक्रिया करण्यात कोणाचा स्वार्थ
जीपीएसीकडून आरटीआयद्वारे मिळविलेल्या माहितीनुसार उमेदवारांने आपल्या ऑनलाईन अर्जात स्पष्ट नमूद केलेले आहे. की त्याने क्रमांक 7 पदासाठी पदासाठी अर्ज करीत असून ती जाहीरात सिव्हील इंजिनिअरींगमधील व आयटीच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आहे. तरीही त्याची प्रक्रिया क्रमांक 6 च्या पदासाठी असलेल्या विद्युत विभागातील सहयोगी प्राध्यापक इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक पदावर केलेली आहे. सदर घोडचूकीनंतरही त्याची नियुक्ती कशी होते. यावरून जीपेएसीनेही त्याच्या चुकांवर पांघरूण घालून मुद्दामहून दुर्लक्ष केल्याचा आढळून येत आहे. अर्ज भरताना केलेल्या चुकाबद्दल अनुप्रयोग नाकारला गेला पाहिजे जीपीएससीने निश्चित नियम व नियमापलीकडे अतिरिक्त विचार का दर्शविला आहे हे न समजण्यापलीकडे आहे. एखादा शिक्षण संस्थेत विद्यादान करण्यासाठी उमेदवारांने दंडनीय गुन्हा केला असून यापुढे तो आपल्या विद्यार्थ्यांना कोणती दिक्षा देईन यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच या पदासाठी लायक असलेल्या अन्य उमेदवारांवर अन्याय झालेला आहे. याप्रकरण गोवा दक्षता खाते, मुख्यमंत्री कार्यालय, राज्यपाल, जीईसीचे प्राचार्य यांच्याकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. सदरप्रकरणी संबंधित खात्य़ांनी योग्य कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा पवित्रा काही प्राध्यापकांनी घेतलेला आहे.









