प्रतिनिधी/बेळगाव
पाणीपुरवठा विभाग तसेच स्मार्ट सिटीच्या कामकाजाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. गोवावेस येथील जलतरण तलावानजीक पाणी सोडण्यासाठीचा व्हॉल्व आहे. तो रस्त्याचे काम करताना खुला ठेवण्यात आला असून त्यामुळे तो अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे रस्त्याला लागून असणारा हा व्हॉल्व झाकण घालून बंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
रस्त्याशेजारीच हा व्हॉल्व असल्याने त्यामध्ये वाहने अडकण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. शुक्रवारी एक कार यामध्ये अडकली. शर्थीचे प्रयत्न करून ती बाहेर काढण्यात आली. रात्रीच्या वेळी दृष्टीस न पडल्याने यामध्ये अडकून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे मोठा अनर्थ घडण्यापूर्वी याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.









