वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गोल्ड एक्सचेंज टेडेड फंडमध्ये (ईटीएफ) ऑक्टोबर महिन्यात जवळपास 384.2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) च्या आधारे चालू वर्षात आतापर्यंत एकूण 6,341.2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या अगोदरच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 597.3 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
सप्टेंबर तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये जवळपास 2,400 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक झाली आहे. एएमएफआयनुसार मागील वर्षातील समान तिमाहीत या गुंतवणुकीने गोल्ड ईटीएफमध्ये 172 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
ईटीएफ म्हणजे काय ?
सोन्याची शेअर बाजाराप्रमाणे खरेदीच्या सुविधेला गोल्ड ईटीएफ म्हटले जाते. यामध्ये म्युच्युअल फंडची योजना आहे. याला एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणूनही ओळखले जाते. ज्याची खरेदी स्टॉक एक्सचेंजवर करुन त्याची विक्रीही केली जाते. गोल्ड ईटीएफ स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेट केले जाते.









