नवी दिल्ली
अभियांत्रिकी व व्यवसाय क्षेत्रात नवे योगदान देण्यासाठी कंपनी सज्ज असणार असून येणाऱया काळात 2000 हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती गोल्डमॅन सॅच यांनी दिली आहे. कंपनीचे नवे कार्यालय (ऑफिस) हैदराबाद येथे सुरू झाले असून 2023 पर्यंत नव्या उमेदवारांना कंपनीत भरती करून घेतले जाणार आहे. जागतिक स्तरावरच्या व्यवसायाकरिता केंद्र हैदराबादमध्ये मार्च 2021 मध्ये स्थापन करण्यात आले असून सध्या 250 जणांचा समावेश कंपनीत आहे. 2021 च्या अखेरपर्यंत ही कर्मचाऱयांची संख्या कंपनीला 800 वर न्यायची आहे.









