मुंबई
गोयल अॅल्युमिनीयम्सच्या समभागाने जवळपास 350 टक्के इतका भक्कम परतावा गुंतवणूकदारांना दिला असल्याची माहिती आहे. सदरचा समभाग सध्याला बाजारात 52 आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर कार्यरत आहे. 20 सप्टेंबर 2022 रोजी 74.95 ऊपये इतका असणारा गोयल अॅल्युमिनीयम्सचा भाव बुधवारी बाजारात 338 ऊपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहचला आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 500 कोटी ऊपयांपेक्षा कमी आहे.









