आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती, पेडणे येथे आरोग्य शिबिरास्थळी दिली भेट
पेडणे : गोवा मेडिकल कॉलेजच्या धरतीवर तुये येथील इस्पितळाचे काम होणार असून त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे. हे काम दोन टप्प्याने पूर्ण करावे लागणार आहे. हा मोठा व्यापक स्वरूपाचा प्रकल्प असून यासाठी आता लवकरच पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा कऊन या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी काम करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पेडणे येथे आरोग्य शिबिरासाठी भेट दिल्यानंतर पत्रकाराशी बोलताना दिली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा आहे त्याच धर्तीवर तुये येथील बांधलेल्या या प्रकल्पावर खर्च होत असून आता नव्यानेच परत सुमारे दोन कोटी ऊपये त्याच्यासाठी खर्च केले आहेत. येणाऱ्या काळात भव्य दिव्य असे आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची एक शाखा म्हणून या इस्पितळाकडे पाहिले जाणार आहे. हे इस्पितळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची एक शाखा असल्या प्रमाणे त्या ठिकाणी सर्व सुविधा आणि आरोग्याच्या यंत्रणा राबवल्या जाणार आहेत, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
या इस्पितळाचे काम पूर्ण झाले नाही. याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. ते पूर्ण न झाल्याने आम्ही हे इस्पिता सुरू करू शकलो नाहीत. मात्र त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च त्यासाठी थोडा वेळ लागणार असून लवकरच आम्ही मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पेडणे आणि मांद्रे मतदारसंघाचे आमदार मिळून मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असून येत्या पाच सहा महिन्यात याबाबत आम्ही ठोस भूमिका घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. पेडण्यात हे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मंत्री विश्वजित राणे यांनी आमदार प्रवीण आर्लेकर आणि ट्रस्टचे कौतुक केले. हे भव्य दिव्य शिबिर आयोजित करून आमदार प्रवीण आर्लेकर यांनी लोकांच्या आणि जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे दायित्व दाखवले आहे. या शिबिरासाठी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणी शिबिर आयोजित करून त्या शिबिरात डॉक्टरनी केलेले निदान हे आमच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करून त्यांना असलेल्या आजारावर उपचार गोव्यात बांबोळी या ठिकाणी घेता येतील तसेच ज्या आजारावर गोव्यात उपचार होत नसेल तर के एल .ई येथे उपचार घेण्यासाठी जाता येईल असे सांगून हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आमदार प्रवीण आर्लेकर तसेच के.एल.ई इस्पितळाचे अभिनंदन केले.









