प्रतिनिधी/ मडगाव
गोमंत विद्या निकेतन 32व्या अखिल गोवा मराठी नाटय़स्पर्धेत अथश्रीं, फोंडा यांनी सादर केलेल्या ‘बुडबुड रे घागरी’ या नाटकाला प्रथम क्रमाक मिळाला असून कै. वसंत गुडे यांच्या स्मरणार्थ फिरता चषक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक रसरंग उगवे यांनी सादर केलेल्या ‘दो बजनिए’ या नाटकाला प्राप्त झाला. तर तृतीय क्रमांक नटरंग क्रिएशन्स नार्वे-डिचोली यांनी सादर केलेल्या ‘आवरण’ या नाटकाला प्राप्त झाला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे, उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम : सुशांत नायक (बुडबुड रे घागरी), द्वितीय : निलेश महाले (दो बजनिए), तृतीय : संतोष शेटकर (आवरण). वैयक्तिक अभिनय पुरूष – प्रथम : गोपाळ भिंबर (बंटी-बुडबुड रे घागरी) द्वितीय : मयूर मयेकर (कालिराम : राशोमान). वैयक्तिक अभिनय स्त्री – प्रमथ : ममता शिरोडकर (लक्ष्मी गौडा-आवरण), द्वितीय : पद्मा भट (मायावती-चाफा).
नैपथ्य : सौमित्र बखले (दो बजनिए), प्रकाश योजना : निलेश महाले (दो बजनिए), पार्श्वसंगीत – सर्वेश भोसले (बुडबुड रे घागरी), वेशभूषा : शनाया महाले (दो बजनिए), रंगभूषा : कृष्णनाथ खलप (चाफा). नाटय़लेखन-प्रथम : ज्ञानेश मोघे (राशोमोन), द्वितीय : मिलिंद बर्वे (आवरण), तृतीय : विजयकुमार नाईक (कोमल आणि तीव्र खिडक्या).
अभिनयासाठी उत्तेजनार्थ पुरूष कलाकार : सौरभ कारखानीस (सिराज-दो बजनिए), सचिन चौगुले (ताज-दोन बजनिए), मिलिंद बर्वे (नारायणशास्त्री-आवरण), अनंत खांडेकर (शेषशास्त्री-आवरण), सलिल नाईक (पुरूष-राशोमोन). उत्तेजनार्थ स्त्री कलाकार : तन्वी देसाई जांभळे, प्रज्ञा कामत (अम्मू -कोमल आणि तीव्र खिडक्या), पूर्ती सावर्डेकर (अंजना-बॉइल्ड बीन्स ऑन टोस्ट), उर्वी रानडे (विमला-बॉईल्ड बीन्स ऑन टोस्ट), स्नेहल गांवकर शेटय़े (कुथल्या : राशोमोन).









