‘आप’चा नीलेश काब्राल यांना इशारा
पणजी प्रतिनिधी
आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नायक यांनी म्हटले आहे की वीजेसंबंधीचा विषय ते गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल यांच्याशी बोलण्यास वा चर्चा करण्यास इच्छुक आहेत. काब्राल यांनी म्हटले होते की ते हा विषय कुठल्याही गोवेकर व्यक्तीबरोबर चर्चा करण्यास तयार आहेत. निलेश यांनी आम आदमी पक्षाला सार्वजनिक वादविवादाचे आमंत्रण देताना वीज पुरवठा विषयावर चर्चेसाठी बोलावले होते. “आप “चा एखादा आमदार दिल्लीहून चर्चेसाठी येत असेल तर त्याच्यासाठी होणारा प्रवासाचा खर्चही आपण प्रायोजित करणार असे आश्वासन दिले होते. पण दिल्लीचे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राघव चड्डा काब्राल यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आव्हान स्वीकारून गोव्यामध्ये उतरले त्यावेळी निलेश म्हणाले की ते हा विषय फक्त दिल्लीच्या वीज मंत्र्यांबरोबर चर्चा करू इच्छित आहेत.
वाल्मिकी नायक यांनी काब्राल यांच्यावर टीका करताना त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आणि स्पष्ट केले की आपण गोव्याच्या मातीतीलच एक सुपुत्र आहोत आणि हा विषय काब्राल बरोबर चर्चा करण्यास इच्छुक आहोत तसेच निलेश यांनी बोलताना “आवटो “(वेडा ) किंवा “मॅड ” असे अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा व शब्द वापरू नयेत.
राघव यांच्याकडून आपल्याला कुठलाही फोन कॉल आला नाही या काब्राल यांनी केलेल्या मखलाशीवर वाल्मिकी यांनी म्हटले आहे की राघव यांनी सर्व पत्रकारांच्या समोर काब्राल यांना फोन केला होता. निलेश यांना खरोखरच वास्तवाचे भान आहे का? असा प्रश्न वाल्मिकी यांनी विचारताना म्हटले की सर्व ठिकाणी गोव्यातले लोक प्रचंड भरमसाठ वीज बिलांबाबत निषेध आणि विरोध व्यक्त करीत आहेत. दिल्लीतल्या लोकांना शून्य वीज बिल येताना गोवेकरांना वीजबिलांचा फटका बसत आहे आणि लोकांना त्रास होत नाही, असे ते कसे म्हणू शकतात? असा प्रश्न वाल्मिकी यांनी केला. दिल्ली प्रशासनाचा 60 टक्के खर्च केंद्र सरकार उचलते या विधानावरही आक्षेप नोंदवत वाल्मिकी म्हणाले की दिल्लीच्या 60 हजार कोटी बजेटमध्ये 350 कोटी रुपये फक्त केंद्रातून दिले जातात. गोव्यात जनतेसाठीच्या कल्याणकारक योजनांच्या लाभार्थ्यांना अजूनही आर्थिक लाभ मिळालेले नाहीत तिथे दिल्ली सरकार लॉकडाउनच्या मंदीच्या काळातही नव्या योजना जाहीर करत आहे. दिल्ली सरकार लॉकडाउनच्या काळात 7.5 किलोचे अतिरिक्त राशन आपल्या लोकांसाठी वितरित करणार आहे आणि हा लाभ 7.1 दशलक्ष लोकांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये ज्ये÷ांचे पेन्शन 2, 250 पासून 4, 500 रुपयांपर्यंत कोविडच्या काळात वाढविण्यात आले आणि इकडे गोव्यातील ज्ये÷ नागरिकांना अनेक महिन्यांपासून पेन्शनच मिळालेले नाही. केजरीवाल सरकारने ज्ये÷ नागरिकांसाठी तीर्थ यात्रेची योजना बनविलेली आहे. दिल्लीत विधवा महिलांना 2, 500 रुपये दर महिन्याला दिले जातात आणि महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत असते. गोव्यात लाडली लक्ष्मी योजना आणि गृह आधार योजना शीतपेटीत बंद आहेत, असा टोला वाल्मिकी यांनी लगावला. संपूर्ण जगणे दिल्लीतील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था वाखाणलेली आहे आणि हावर्ड विद्यापीठाने त्यावर अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपला हीच व्यवस्था गोव्यात आणण्यासाठी काय समस्या आहे, हे आपल्याला समजत नाही अशी टीका वाल्मिकी यांनी केली आहे. दिल्लीत असलेल्या मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत उपचार व सर्जरी केली जाते व संपूर्ण जगाचे लक्ष या मोहल्ला क्लिनिक प्रणालीने वेधून घेतलेले आहे आणि इकडे गोव्यात खाजगी असो किंवा सरकारी हॉस्पिटल, औषधे फुकट दिली जात नाही की उपचारही मोफत नसतात. लोकांनी कुठले सरकार चांगले आहे, हे ठरविण्यासाठी प्रोटोकॉलचे निमित्त पुढे न करता या मुद्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे वाल्मिकी नायक यांनी शेवटी सांगितले.









