युवा काँग्रेस तर्फे पत्रादेवी हुतात्मा स्मारकाकडे निदर्शने करत सरकारचा निषेध करत केली मागणी
पेडणे / प्रतिनिधी
भाजप सरकार हे डोळे असून आंधळे आहे तर कान असून बहिरे आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने सरकारने गोमंतकीय जनतेच्या जीवाशी आणखी न खेळता राज्याच्या सर्व सीमा सरकारने बंद कराव्यात आशी जोरदार मागणी गोवा काँग्रेस युवा समितीने आयोजित केलेल्या निदर्शने कार्यक्रमात पञादेवी येथील हुतात्मा स्मारकाजवळ केली
राज्यात बाहेरून येणाऱया वाहनांची आणि नागरिकांची योग्य ती तपासणी होत पञादेवी येथील सीमेवर होत नाही . वाहनचालक कुठून येतात कुठे जातात, त्यांना कोण क्वारंटाइन करतो , सरकारने लॉकडाऊन काळात कोरोनाविषयी घ्यायची ती काळजी घेतली नाही , कोरोनाची संख्या आता शहरातून गावागावात पोचलेली आहे तहीही सरकार आरोग्याच्या नजरेतून काळजी घेत नाही असा आरोप करत राज्यातील सर्व सीमा बंद करण्याची जोरदार मागणी युवा काँग्रेस कार्यकर्ते यांनी पञादेवी येथे केली.
एक दोन एक दोन भाजपा सरकार को फेक दो अश्या घोषणा देत , बाहेरच्या वाहनांना प्रवेश देवू नका अशी मागणी करत युवा काँग्रेसने शनिवारी 13 रोजी पत्रादेवी हुतात्मा स्मारकाजवळ निदर्शने केली .
पञादेवी येथे मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात
या वेळी पञादेवी हुतात्मा स्मारकाकडे मोठय़ा प्रमाणात पोलीस फौज फाटा होता. त्यात म्हापसा पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई , पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर , म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर ,पेडणे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर , संयुक्त मामलेदार गौतमी परमेकर आदी अधिकारी तसेच मोठय़ा संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते .
ड़ राज्याच्या सीमा वरून परराज्यातून येणाऱया नागरिकाना कोरोना लागण होत आहे . बाहेरील नागरिकाना प्रवेश न देता जे गोवेकर इतर राज्यात बाहेर आहेत त्याना सुरक्षित सरकारने आणावे ,मात्र बाहेरच्या नागरिकाना राज्यात प्रवेश देऊ नये त्वरित राज्यातील सर्व सीमा बंद कराव्यात अशी मागणी युवा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पत्रादेवी येथे केली .
ड़ संतप्त काँग्रेस कार्यकर्ते चेकनाक्मयावर चाल करून जाणार होते त्याचवेळी घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभू देसाई , पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर , तुषार लोटलीकर आदी अधिकाऱयांनी कार्यकर्त्याना रोखून धरले . संतप्त कार्यकर्ते अमरनाथ पणजीकर , जनार्दन भंडारी , उत्तर गोवा सचिव सचिन परब , उत्तर गोवा सचिव सुभाष केरकर , प्रणव परब, संदिप किनळेकर, उत्तर गोवा सचिव प्रमेश मयेकर , संजय तारी, तुळशीदास आरोलकर आनंद केरकर , , अनिल हरमलकर आदींनी उपस्थित असलेल्या पेडणे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर याना उलट सुलट प्रश्न करून भंडावून सोडले . हिम्मत असेल तर लगेच सीमा बंद करा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यावर उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर , तुमचे काय निवेदन आहे ते आपल्याला सादर करा , आपण सरकारला कळवतो , त्यावर अमरनाथ पणजीकर यांनी प्रतिप्रश्न करताना सांगितले यापूर्वीच सरकारला निवेदने सादर केली त्याची प्रत तुम्हाला मिळाली कि नाही असा सवाल केला . पत्रादेवी चेक नाक्मयावरून जी मोठी वाहने येतात त्यातील चालक याना कुठे क्वारंटाइन केले जाते असा सवाल केला त्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी नाक्मयावरून येणाऱयाना कुठे क्वारांटाइन केले जाते असे विचारले असता उपजिल्हाधिकारी रविशंकर यांनी सांगितले कि कॉरटाईन केले जाते . त्यावर संतप्त प्रमेश मयेकर अमरनाथ पणजीकर , जनार्दन भंडारी , सचिन परब यांनी काही जणांचे पुरावे मोबाईलवर उपजिल्हाधिकारी निपाणीकर याना दाखवले तेव्हा त्याविषयी काही उत्तर ते देवू शकले नाहीत.
आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला पत्रादेवी हुतात्मा स्मारकाजवळ निदर्शने केली . या वेळी युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर , उत्तर गोवा सचिव सचिन परब , जनार्धन भंडारी , प्रमेश मयेकर , माजी आमदार आग्नलो फर्नांडीस , विठू मोरजकर , सुभाष केरकर , प्रदीप हरमलकर , संजय तारी , प्रणव परब , पेडणे गटाध्यक्ष उमेश तळवणेकर, मांदे गटाध्यक्ष संदिप किनळेकर, गुरु पांडे, इजिदोर फर्नांडिस, महेश कांबळी, आनंद केरकर, संजय तारी, शशिकांत कांबळी, तुळशीदास आरोलकर, राजू गावडे, सुरज रेडकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते , हातात वेगवेगळे फलक घेवून कोरोना हटावो , सीमा बंद करा , सरकार को हटावो असे फलक होते .
गोव्याच्या सीमा बंद कराव्यात : अमरनाथ पणजीकर
गोव्यासाठी गोवेकाराच्या सुरक्षतेसाठी राज्याच्या सीमा सरकारने बंद कराव्यात , जगभर महामारीचे संकट असताना गोवा सरकारने कोरोना झिरो दाखवून आकाशातून पुष्पांजली करून आंदोत्सव साजरा केला . मात्र जी काळजी घ्यायची होती ती घेतली नाही . म्हणून आज त्याचा परिमाण दिसून येतो . कोरोना रुग्ण गावागावात वाढत आहे . सुरुवातीपासून तपासणी करण्याची प्रक्रिया करा अशी मागणी केली मात्र दखल घेतली नाही . वास्को कोरोना रुग्ण वाढले त्या वेळीही सांगितले कि लॉकडाऊन करा मात्र तिथंही ऐकले नाही ,सरकार लॉकडाऊन करायला तयार नाही . गोव्याच्या सर्व सीमा बंद करा असेही सांगितले .मात्र सरकारने दखल घेतली नाही असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केली .

सीमा बंद न केल्यास गोव्यात मृत्यूचे प्रमाण वाढून अर्धे लोक मृत्यू पावणार , याला सरकार जबाबदार : आग्नेल फर्नांडिस
कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी भाजप सरकारवर आरोप करताना हे सरकार कोरोनाशी खेळत असून या खेळात गोमंतकीयांचे जीवन धोक्मयात घालत आहे. लोकल टार्समिशन आणि कमिनीटी ट्रार्समिशन यात सरकार अडला आहे. सरकारने जर सीमा बंद केल्या नाहीत तर येणाऱया काही दिवसात कोरोनामुळे अर्धे लोक मरण पावणार व याला सर्वस्वी सरकार जबाबदार असणार असा इशारा देत सरकारने त्वरीत सीमा बंद कराव्यात अशी मागणी केली.
पञादेवी येथे कोविड चाचणी केंद्र सुरु करा : सचिन परब
सचिन परब यांनी बोलताना नाक्मयावर पोलीस अधिकारी कोरोनाशी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. माञ त्यांना कुठल्याच प्रकारच्या सुविधा या ठिकाणी नाही. पोलीस , डाॕक्टरर्स जसे कोरोना योद्धा आहेत त्याच प्रमाणे पत्रकारही कोरोना योद्धा आहेत तेही आपला जीव धोक्मयात घालून काम करत आहेत. सरकारने गोमंतकीयाच्या जीवाशी न खेळता गोव्यात येणाऱया व्यक्तीसाठी पञादेवी चेक नाक्मयावर कोविड चाचणी केंद्र उभारावे अशी मागणी यावेळी सचिन परब यांनी केली.
जनता मोठे की सरकार मोठे ? : विठू मोरजकर
लोकांची मागणी असताना सरकार लाॕकडाऊन का करत नाही, हे सरकार जनतेचे हित पाहणार की चाळीस आमदार यांचे हित जोपासणार असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते विठू मोरजकर यांनी यावेळी सरकारला केला. गोव्याच्या विविध भागात नागरिक पंचायत आणि पालिका क्षेत्रात लाॕकडाऊन स्वच्छेने करत आहेत माञ सरकार खाण व्यवसाय आणि कोळसा व्यवसाय मालकाचे व चाळीसही आमदार व सरकारातील मंञी यांचे हित जोपासत असून लाॕकडाऊन करण्याचे टाळते . जनतेची मागणी असताना सरकार जानतेच्या जीवाशी खेळत असून गोव्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे करत असल्याचे सांगत आहे. माञ सरकार जनतेचे हित जपत नाहीतर व्यवसायिकाचे हित जपत असल्याचा आरोप विठू मोरजकर यांनी यावेळी केला.
सरकाराचे डोळे आणि कान उघडण्याची आज गरजा आहे , युवा काँग्रेस प्रदेश : अध्यक्ष वरद म्हार्दोळकर
यावेळी बोलताना युवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर म्हणाले भाजप आमदाराच्या मतदारसंघात आज मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्ण मिळत आहेत माञ ते आपले कान डोळे बंद करुन आहेत हे सरकारे डोळे असून आंधळे झाले आहे तर कान असून बहिरे झाले आहे.सरकारला गोव्याच्या जनतेपेक्षा कोळसा वाहतूक महत्त्वाची वाटत आहे. यासाठी नागरिकांचा आता सरकारवरचा विश्वास उडाला आहे.नागरिक स्वता पुढे येऊन लाॕकडाऊन करत आहेत तरी सरकार डोळे उघडतनाही.आज जनतेच्या हितासाठी आम्ही इथे आमचा जीव धोक्मयात घालून आलो आहोत तसेच पञकारही आपला जीव धोक्मयात घालत आहेत.यासाठी आतातरी सरकारने जागे होऊन सर्व सीमा बंद कराव्यात अशी मागणी वरद म्हार्दोळकर यांनी केली.









