गडहिंग्लज / प्रतिनिधी
गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील युवकाचा गोबर गॅसमध्ये पडून गुदमरुन मृत्यू झाला. शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. संतोष दुडाप्पा अमिनभावी (वय- २८) असे त्याचे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
संतोष आणि त्याची पत्नी अक्षता घराच्या मागे असणाऱ्या गोबर गॅसच्या कडेला साफसफाई करत होते. दरम्यान संतोष पाय घसरुन गोबर गॅसच्या टॉकीत पडला. यावेळी पत्नी अक्षता हिने संतोष गोबर गॅसच्या टॉकीत पडलेल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. धावपळ करत शेजाऱ्यानी येऊन गोबर गॅसमधील शेण उपसुन त्याला बाहेर काढले. तत्पूर्वी त्याच्या गोबर गॅसच्या टॉकीत गुदमरून मृत्यु झाला होता. संतोष जेसीबीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी,मुलगी असा परिवार आहे. सदरच्या घटनेची गडहिंग्लज पोलीसात नोंद झाली असून अधिक तपास हवालदार संभाजी कोगेकर करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









