वृत्तसंस्था/ सिडनी
2020 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या एटीपी चषक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या डेन इव्हान्सने 11 व्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गोफीनचा पराभव केला पण बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने अल्बॉटचा पराभव करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली.
क गटातील या लढतीत बल्गेरियाच्या कुझमेनोव्हने कोझबिनोव्हचा सलामीच्या एकेरी सामन्यात 6-1, 7-5 असा पराभव करून आपल्या संघाला विजयी सलामी मिळवून दिली. ब्रिटनच्या डेन इव्हान्सने गोफीनचा 6-4, 6-4 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने अल्बॉटचा 6-2, 6-3 असा पराभव केला. ब्रिटन आणि बेल्जियम यांच्यातील या लढतीत ब्रिटनने 2-1 अशी आघाडी मिळविताना निर्णायक दुहेरीचा सामना जिंकला.









