मुंबई
गृहबांधणी क्षेत्राकरीता कर्ज किंवा वित्त सेवा देणारी गोदरेज हाऊसिंग फायनान्स येणाऱया काळात 500 ते 1500 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे समजते. 2021-2022 आर्थिक वर्षात सदरच्या वरील रक्कमेची उभारणी केली जाणार आहे. यासाठीच्या आवश्यक उपाययोजनांना गोदरेजकडून सुरूवात झाल्याचे समजते. सध्याचा काळ हा रक्कम उभारणीसाठी योग्य असल्याचे कंपनीने म्हटले असून 20 लाख कोटींच्या उलाढालीकरीता कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. कंपनीने 1 हजार कर्जांना मार्चअखेर मंजुरी देणार असल्याचेही सांगितले आहे.









