मुंबई
बांधकाम क्षेत्रातल्या गोदरेज प्रॉपर्टीजला चालू आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीअखेर बुकिंगच्या माध्यमातून होणाऱया विक्रीमध्ये घट अनुभवायला मिळाली आहे. विक्री बुकिंगच्या माध्यमातून सदरच्या कालावधीत कंपनीला 1074 कोटी रुपये जमवता आले आहेत. मागच्या वषी याच कालावधीत कंपनीने 1446 कोटी रुपये जमवले होते. एकंदर बुकिंगचा विचार करता 26 टक्के इतकी घट सप्टेंबरच्या तिमाहीअखेर कंपनीला सोसावी लागली आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यात कंपनीने बुकिंगच्या माध्यमातून 11 टक्के वाढीसह 2 हजार 605 कोटी रुपये मिळवले आहेत.









