प्रतिनिधी / बेळगाव
केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये हॉकीपटू ध्यानचंद यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडादिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे होते.
आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण आणि खेळाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एच. विरापूर होते. यावेळी प्रा. गॅमा नाईक, डॉ. एस. जी. सुगुर, डॉ. एम. एल. लमाणी, डॉ. दत्ता कामकर व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी नाईक व प्रा. संध्या जोशी यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. मंजुनाथ गौडा व प्रा. नम्रता यांनी मेहनत घेतली.









