प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे पीयू कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड सायन्स येथे ‘उत्साह’ हा तीन दिवसांचा महोत्सव थाटात पार पडला. यामध्ये गायन, नृत्य, इंधनाशिवाय पाककृती, मोबाईल फोटोग्राफी, प्रश्नमंजुषा, पेन्सिल स्केच या स्पर्धा तसेच फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन व टेबल टेनिस हे खेळ घेण्यात आले.
महोत्सवाचे उद्घाटन आरपीडीच्या माजी प्राचार्या डॉ. स्मिता सुरेबानकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी ‘बेळगाव जिह्याचा समृद्ध वारसा आणि इतिहास’ यावर माहिती देऊन याचे जतन करण्यात महिलांची भूमिका कोणती, हे स्पष्ट केले. प्रारंभी सिमंतीनी साधले हिने स्वागतगीत सादर केले. लक्ष्मी देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. भारती हेगडे यांनी परिचय करून दिला. एस. बी. भेंडीगेरी यांनी आभार मानले.
सांगता समारंभाला पदवीपूर्व खात्याचे उपसंचालक व्ही. नागराजू उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून गोगटे पीयूचे प्राचार्य व्ही. एम. देशपांडे उपस्थित होते.
भारती हेगडे यांनी अहवाल सादर केला. शैलजा विभुते, अंजली नाडगौडा व लक्ष्मी देशपांडे यांनी स्पर्धांचे निकाल जाहीर केले. प्रारंभी रचना वेर्णेकर यांनी नृत्य सादर केले. प्राचार्य डॉ. ए. एस. केरूर यांनी स्वागत केले. अनिता राठोड यांनी आभार मानले.