प्रतिनिधी / कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडण्यासाठी नाटयपूर्ण घडामोडी घडत असून सोमवारी तीन संचालकांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात दंड थोपटले. माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील, अरुणकुमार डोंगळे आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी एकत्र येऊन स्वतंत्ररित्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे ठराव दाखल केल्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. सकाळी नऊ वाजता तिघ्यांनी कार्यकर्त्यांसह ठराव दिले. यामध्ये विश्वास पाटील यांनी 293 तर अरुण डोंगळे यांनी 204 ठराव दाखल केले. उदयापर्यंत आणखी शंभर ठराव देण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी बोलताना डोंगळे आणि पाटील यांनी संघाच्या हितासाठी आम्ही एकत्र झालो असून, सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे सांगितले.
यावेळी माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे समर्थक तसेच जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, सचिन पाटील, तुकाराम पाटील, धीरज डोंगळे आदी उपस्थित होते.









