वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथील खापरे माळ येते राहत असलेल्या रघुनाथ बंडू मांगले (वय 50 )मूळ राहणार सेनापती कापसी हणबरवाडी, सध्या राहणार खापरे माळ गोकुळ शिरगाव यांनी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी घराच्या तुळीला दोरी बांधून घेऊन आत्महत्या केली.
मांगले हे गोकुळ शिरगाव येथील सुतमिल मध्ये काम करत होते. त्यांना एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असे त्यांचे कुटुंब आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि प्रणाली पवार करीत आहेत. या घटनेची फिर्याद चंद्रकांत मारुती एळके यांनी दिली.









