वार्ताहर / गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव( तालुका) करवीर येथील बॉक्सिंग पट्टू असलेला खेळाडू गौरव म्हाकवे याने आपल्या जीवनातून अचानक एक्झिट घेतल्याने गोकुळ शिरगाव परिसरात तरुण वर्गामध्ये शोककळा पसरली आहे.
गौरव धनाजी महाकवे (वय 18 )याचे आज रविवारी सकाळच्या सुमारास शरीरातील साखर अचानक वाढल्याने त्याला त्रास जाणवू लागला. त्याला खासगी दवाखान्यात नेले असता संध्याकाळी चारच्या सुमारास त्याला या त्रासातून चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तो लहानपणापासूनच खेळामध्ये जास्त असल्याने गेल्या दोन वर्षापासून त्याने तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर. राज्यस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत खेळून चांगले नाव करून त्याने बऱ्याच ठिकाणी प्रशस्तीपत्र व शिल्ड मिळवून आणले होते.
गौरव याचा चेहरा सतत हसरा असल्यामुळे व लोकांच्या बरोबर गोड बोलणे राहिल्याने त्याचा मित्र परिवारही मोठा होता. आज अचानक त्याचा मृत्यू झाल्याने गोकुळ शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









