31 ऑगस्टपर्यंत विद्यामान संचालकांना मुदतवाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी एकदा लांबवणीवर टाकण्यात आल्या आहेत. न्यायालयाचे आदेश असलेल्या संस्था या आदेशातून वगळण्यात आल्या आहेत. अनिल चौधरी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. आतापर्यंतची ही सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु राहणार आहे. तथापि गुरुवार 8 रोजी सर्वोच्च न्यायालयातील निकालावर गोकुळची निवडणूक अवलंबून आहे.
महात्मा फुले कर्जमाफीचे काम सुरळीत होण्यासाठी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 27 जानेवारी 2020 पर्यंत तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर देशभर कोरोनाची लाट आली. त्यामुळे तीन तीन वेळा तीन-तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला. शनिवारच्या आदेशाने पाचव्यांदा मुदतवाढ मिळालेली आहे.
कोरोनाच्या सावटामुळे वार्षिक सभांवर निर्बंध आणले होते. 31 मार्चपर्यंत सभा घेण्यास मुदतवाढ दिली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने काही संस्थांची वर्षिक सभा घेण्याची तयारी सुरु केली होती. मात्र तत्पूर्वीच जानेवारीमध्ये निवडणुका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 31 मार्चला याबाबतच मुदत संपली होती. मुदत संपूनही नव्याने आदेश न आल्याने संभ्रम तयार झाला होता. मंगळवारी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने संचालक मंडळास दिलासा मिळाला आहे.
बँक्स करणे
आतापर्यंत मुदतवाढ
1- 27 मार्च 2020
2-18 मार्च 2020
3- 17 जून 2020
4-24 सप्टेंबर 2020
5- 16 जानेवारी 2021
6-6 एप्रिल 2021