प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच जिल्हा दूध संघ गोकुळच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. आज विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले. २१ उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, अजित नरके आदी प्रमुख उमेदवार असणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनायक कोरे आणि आघाडीतील इतर नेते यावेळी उपस्थित होते.
लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा > राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे उमेदवार जाहीर
Previous Articleकर्नाटकात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन नाही; व्हायरल परिपत्रक खोटे
Next Article कूल कूल ऑरेंज मिस्टिक









