प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यात कोरोनाच्या महामारीची दुसरी लाट आली आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस दुपटीने वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन करीत उपायोजना सुरु केले मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातच याचा फज्जा उडालेला आहे.
गोकुळ निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर, गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस उरले आहेत.यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या करवीर प्रांत कार्यालयातील गोकुळ निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या दालनाबाहेर आणि इमारतीच्या परिसरात प्रचंड गर्दी झालेली आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेले उमेदवार कार्यकर्त्यां सह शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरण्यासाठी येत आहेत त्यामुळे प्रचंड गर्दी झालेली आहे. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पुरेशे पोलीस बळ उपलब्ध नाही. अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत अशीच गर्दी होत राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन याची गंभीर दखल कधी घेणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
Previous Articleभाजप आमदार माझी हत्या करतील : तरुणीची उच्च न्यायालयात धाव
Next Article प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू









