प्रतिनिधी / कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. पालकमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्र मोट बांधत जोरदार ‘लढाई’ केली. यामध्ये सत्ता परिवर्तन करण्यात यश मिळवले. या सर्व घडामोडीत जिल्ह्Îातील काँग्रेस पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन विजयी करण्यामध्ये पालकमंत्री पाटील यांनी यश मिळवले.
पूर्वी कधीही गोकुळच्या निवडणूकीत पक्षीय कार्यकर्त्यांला संधी दिली जात नव्हती. परंतू शाहूवाडीचे कर्णसिंह गायकवाड, पन्हाळा अमर पाटील, युवक काँग्रेस उपाध्यक्ष बयाजी शेळके, माजी महीला अध्यक्षा अंजनाताई रेडेकर, जिल्हा सरचिटणीस विद्याधर गूरबे यांची उमेदवारी देताना पक्षीय संघटनेतील कामाची बाजू याचा निश्चित विचार करून झूकते माप दिले. यापैकी करणसिंह गायकवाड, अमर यशवंत पाटील, बयाजी शेळके, अंजनाताई रेडेकर या विजयी झाल्या आणि विद्याधर गुरबे अवघ्या 13 मतांनी विजयापासून हूकले. परंतू यासर्व निवडणूकीतून काँग्रेस पक्षीय पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संधी मिळू शकते, हा संदेश यशस्वीरीत्या पोहचवण्यात पालकमंत्री पाटील यशस्वी झाले. शिक्षक मतदार आणि गोकुळ निवडणूकीच्या माध्यमातून जिल्ह्Îातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामध्ये करणसिंह गायकवाड व अमर पाटील यांची उमेदवारी ही जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोटÎातून दिले असले तरी ते मूळचे काँग्रेसचे आहेत.